Vidhansabha Election
सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात जोडेमारो आंदोलन
प्रणिती शिंदेंविरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
थोडक्यात
सोलापुरात प्रणिती शिंदेंविरोधात जोडेमारो आंदोलन
कार्यकर्त्यांकडून जोडेमारो आंदोलन
प्रणिती शिंदेंविरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. यावेळी सोलापूर शहर दक्षिणमध्ये काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत प्रणिती शिंदेंविरोधात कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं प्रणिती शिंदेंवर टीका करण्यात येत आहे.