स्वामी प्रभुपाद जयंती निमित्त खास नाणे मोदींच्या हस्ते प्रदर्शित

स्वामी प्रभुपाद जयंती निमित्त खास नाणे मोदींच्या हस्ते प्रदर्शित

Published by :
Published on

इस्कॉनची स्थापना कारणारे, महान कृष्णभक्त आणि हरेकृष्ण भक्ती आंदोलनाचे प्रणेते स्वामी प्रभूपाद्जी यांच्या १२५ व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १२५ रुपयांचे खास नाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. स्वामींनी १०० हून अधिक इस्कॉन मंदिरे उभारली असून जगाला भक्तीमार्गाचा परिचय करून दिला. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १२५ रुपयाच्या या स्मृतीचिन्ह नाण्याला अतिशय आकर्षक रूप दिले गेले आहे. एका बाजूला अशोक स्तंभ आणि १२५ रुपये हा आकडा आहे तर दुसऱ्या बाजूला स्वामी प्रभुपादजी यांची प्रतिमा कोरली गेली आहे.

वेळोवेळी देशात अशी नाणी स्मृतीचिन्ह म्हणून जारी केली जातात. ही नाणी विशेष असल्यामुळे त्यांच्या छापील मूल्यापेक्षा त्यांची किंमत अधिक असते. अनेक लोक अशी नाणी साठवितात. त्यांना रिझर्व बँकेतून वेबसाईटवर नोंदणी करून अशी नाणी खरेदी करता येतात. या नाण्यांसाठी अगोदर बुकिंग करावे लागते. मुंबई आणि कोलकाता येथील टांगसाळीत अशी नाणी तयार होतात. या वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त असेच १२५ रुपये मूल्याचे नाणे सरकारने जारी केले आहे. त्यावर सुभाषबाबूंची प्रतिमा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com