नीरज चोप्रासह ११ खेळाडूंना मिळणार खेलरत्न पुरस्कार
टोक्यो ऑलिम्पिकमधील भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अॅथलीट नीरज चोप्राला यावर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. नीरजसह ११ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. यामध्ये कुस्तीपटू रवि दहिया, महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांसह इतर खेळाडूंना हा पुरस्कार मिळणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीसाठी गठीत केलेल्या समितीने ११ खेलरत्न पुरस्कारांसह ३५ अर्जून पुरस्कारांची घोषणा केली आहे.टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव मोठं करणाऱ्या ४ पदक विजेत्यांचा यात समावेश आहे. तर टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या ५ खेळाडूंचा समावेश आहे.
'या' खेळाडूंना मिळणार पुरस्कार
भालाफेकपटू नीरज चोप्रा,क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनील छेत्री, कुस्तीपटू रवि दहिया, बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, सुमित अंतिल, अवनि लेखरा, कृष्णा नगर आणि एम नारवाल यांच्या नावाचा समावेश आहे.