अय्यर-सुदर्शनची तुफानी फलंदाजी; भारताचा दक्षिण अफ्रिकेवर 8 गडी राखून विजय

अय्यर-सुदर्शनची तुफानी फलंदाजी; भारताचा दक्षिण अफ्रिकेवर 8 गडी राखून विजय

भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांच्या तुफानी फलंदाजीने भारताचा एकतर्फी विजय मिळवला आहे.

नवी दिल्ली : भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण अफ्रिकेचा डाव 116 धावांतच गुंडाळला. यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी फलंदाजी करत आठ विकेट राखून एकतर्फी विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण अफ्रिकेचा 58 धावांत 7 धक्के दिले. भारताकडून अर्शदीपने पाच आणि आवेश खानने चार आणि कुलदीप यादवने एक विकेट घेतली. आणि दक्षिण अफ्रिकेचा डाव 116 धावांतच गुंडाळला.

यानंतर 117 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (5) विकेट गमावली. यानंतर मात्र श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांच्यात ८८ धावांची भागीदारी झाली. श्रेयस अय्यर 111 धावांवर बाद झाला. साई सुदर्शन 43 चेंडूत 55 धावा करून टिळक वर्मा (1)सह नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 16.4 षटकांत 2 विकेट गमावून पराभव केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com