क्रिकेट चाहत्यांसाठी अनोखं गिफ्ट; भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वे सोडणार विशेष ट्रेन

क्रिकेट चाहत्यांसाठी अनोखं गिफ्ट; भारत-पाक सामन्यासाठी पश्चिम रेल्वे सोडणार विशेष ट्रेन

या सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी पश्चिम रेल्वे मंबुई ते अहमदाबाद दरम्यान स्पेशल ट्रेन चालवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi

क्रिकेट चाहते 14 ऑक्टोबर रोजी भारत- पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहताय. या सामन्यासाठी पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी पश्चिम रेल्वे मंबुई ते अहमदाबाद दरम्यान 2 स्पेशल ट्रेन चालवणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रेन 13 ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजता मुंबईतून निघेल. ही ट्रेन सकाळी साडे पाच पर्यंत अहमदाबादमध्ये दाखल होईल. तसेच सामन्याच्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबादच्या दिशेने रवाना होणार आहे.

काल पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकिटं अवघ्या 17 मिनिटांत फुल्ल झाली. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं दुसऱ्या स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. ही ट्रेन आज रात्री 11.20 वाजता मुंबई सेंट्रल इथून सुटणार असून उद्या सकाळी 7.20 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या विश्वचषक स्पेशल ट्रेनची क्षमता 1531 आसनांची आहे.

ट्रेन क्रमांक 09013 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद स्पेशल शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई सेंट्रल येथून 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 09014 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल स्पेशल अहमदाबादहून रविवार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी 4 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी दादर, बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, नवसारी, सुरत आणि वडोदरा जंक्शन येथे थांबेल.

भारतीय चाहते आणि टीम इंडियाचा उत्साह वधारण्यासाठी वंदे भारत ट्रेन तिरंग्याच्या रंगात रंगात रंगणार आहे. या ट्रेनमध्ये देशभक्तीपर गाणी वाजवणार आहेत. भारतीय रेल्वेसह गुजरात मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सामन्याची तयारी केली आहे. सामन्याच्या दिवशी मेट्रो ट्रेनची वेळ वाढविण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com