SRH vs PBKS
SRH vs PBKS

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ४ विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादने १९.१ षटकात ६ विकेट्स गमावून २१५ धावा करून या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला.
Published by :

SRH vs PBKS, IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ६९ वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगला. पंजाबने प्रथम फलंदाजी करून निर्धारित २० षटकांमध्ये ५ विकेट्स गमावून २१४ धावा केल्या. त्यानंतर २१५ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ४ विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादने १९.१ षटकात ६ विकेट्स गमावून २१५ धावा करून या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे हैदराबाद १७ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

हैदराबादसाठी ट्रेविस हेडला या सामन्यात धावांचा सूर गवसला नाही. हेडने भोपळाही फोडला नाही. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर हेड शून्यावर बाद झाला. परंतु, सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी करून २८ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारून ३३ धावा केल्या. नितेश रेड्डीने २५ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. तर हेन्री क्लासेनन्ं २६ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून हैदराबादला विजय मिळवून दिला.

अब्दुल समदने नाबाद ११ आणि सनवीर सिंगने नाबाद ६ धावांची खेळी केल्यानं हैदराबादला पंजाबविरोधात विजय मिळवण्यात यश आलं. हैदराबादसाठी पॅट कमिन्सने १, वियासकंथ १, तर नटराजनने २ विकेट्स घेतल्या. पंजाबसाठी अथर्व तायडे (४६), प्रभसीमरन (७१), रोसो (४९), शशांक सिंग (२), जितेश शर्मा (३२) धावांची खेळी केली. तसच गोलंदाज अर्शदीप सिंगने २, हर्षल पटेलने २, तर हरप्रीत ब्रार आणि शशांक सिंगने प्रत्येक १ विकेट घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com