IPL 2021: अक्षर पटेलची कोरोनावर मात

IPL 2021: अक्षर पटेलची कोरोनावर मात

Published by :
Published on

दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता तो संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.

अक्षर पटेल गेल्या २८ मार्चला संघात सहभागी झाला होता. कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्याला बायो बबलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मात्र 3 एप्रिलला केलेल्या चाचणीत त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्याला कोरोनाची साधी लक्षणं दिसत होती. त्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. आत त्यांने कोरोनावर मात केली आहे.आता अक्षर पटेलने कोरोनावर मात करुन पुन्हा एकदा संघात सहभागी झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

"बापू (अक्षर पटेल) दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सहभागी झाला आहे. तो आल्याने सर्वजण आनंदी आहेत", असं ट्वीट दिल्ली कॅपिटल्सने केलं आहे. 'माणसं बघून मला मजा येत आहे', असं अक्षर पटेल व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com