Asia Cup 2022 : भारतासाठी आज 'करो या मरो'ची स्थिती; श्रीलंकेसोबत होणार लढत
नवी दिल्ली : आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीत आज भारताचा सामना श्रीलंकेशी (IND vs SL) होणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या चार संघांनी सुपर-4 मध्ये स्थान मिळवले होते. पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर आता भारतीय संघाला अंतिम फेरीच्या शर्यतीत राहायचे असेल तर श्रीलंकेचा पराभव करणे भाग आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानने, अफगाणिस्तान आणि भारताचा पराभव करून प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. आता पाकिस्तान आणि श्रीलंका गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत.
संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे मायदेशी परतला आहे. यामळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान मिळाले. पण, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ते विशेष खेळताना दिसले नाही. या सामन्यात संघाला रवींद्र जडेजाची कमतरता असली तरी पाच विकेट पडल्यानंतर दीपक हुडा आणि कोहली यांच्यानंतर फलंदाजीशिवाय भारताकडे पर्याय नव्हता. यानुसार भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतात.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दीपक हुडाचा संघात समावेश होता, पण, त्याला एक षटकही टाकण्यात आले नाही. यामुळेच दीपकऐवजी दिनेश कार्तिकला जागा देता आली असती. त्याचप्रमाणे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यापैकी कोणाला संघात ठेवणार हाही मोठा प्रश्न आहे. तर, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल या दोघांचाही संघात समावेश होऊ शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजचा सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे, अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा भारतीय प्लेइंग इलेव्हनवर असतील.

