भारत-पाकिस्तान महामुकाबला; वर्षभरानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार
आशिया कप स्पर्धा 2023 मधील तिसरा सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागले आहे. आगामी वर्ल्ड कपआधी आशिया खंडातील 6 पैकी 5 संघांसाठी आशिया कप स्पर्धा महत्त्वाची आहे. पाकिस्तानने प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ज्या मैदानावर सामना झाला तिथेच भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना आहे. आशिया चषकात T20 फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान फक्त तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला तर एका सामन्यात पाकिस्तानने जिंकले होते. श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.