Asia Cup 2023 Team India Squad : 'हे' आहेत आशिया चषकासाठी भारताचे शिलेदार; कुणाला डच्चू, कुणाला संधी?

Asia Cup 2023 Team India Squad : 'हे' आहेत आशिया चषकासाठी भारताचे शिलेदार; कुणाला डच्चू, कुणाला संधी?

आशिया चषकासाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

आशिया चषकासाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघ पूर्ण ताकदीने उतरणार आहे.अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समिती आज संघाची घोषणा करण्यात आली. आशिया चषकात तिलक वर्मा वनडमध्ये पदार्पण करणार आहे. कुलदीप यादव, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा यांनी स्थान मिळाले आहे तर युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन या अनुभवी फिरकी गोलंदाजांना आशिया चषकासाठी संधात स्थान मिळालेले नाही.

30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा सामना रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे.

आशिया चषकासाठी भारताचा संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com