Rahul Dravid | asia cup
Rahul Dravid | asia cupteam lokshahi

Rahul Dravid : आशिया कपपूर्वी भारताला मोठा धक्का, राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह

राहुल द्रविड आशिया चषकातून बाहेर पडण्याची शक्यता
Published by :
Shubham Tate

asia cup : आशिया चषक 2022 च्या आधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे कोरोना पॉझिटिव्ह (कोविड-19) असल्याचे आढळून आले आहे. आशिया चषकासाठी टीम इंडियाला आज (23 ऑगस्ट) राहुल द्रविड आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुबईला रवाना होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईला जाण्यापूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविडची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशात राहुल द्रविड आशिया चषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. (asia cup coach rahul dravid test covid 19 positive ahead)

Rahul Dravid | asia cup
टोमॅटो फ्लूचा लहान मुलांना धोका, अशी घ्या काळजी

टीम इंडियाला आज (23 ऑगस्ट) आशिया कपसाठी रवाना होणार आहे. सध्या, टीम इंडिया राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि केएल राहुल यांच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. जिथे भारतीय संघाने झिम्बाब्वेचा त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला आहे. आशिया कपसाठी निवड झालेल्या टीम इंडियाचे काही खेळाडू आज झिम्बाब्वेहून दुबईला रवाना होणार आहेत.

Rahul Dravid | asia cup
Office Etiquette : आजच तुमची ही वागणूक बदला, अन्यथा ऑफिसमध्ये व्हाल सर्वांचे शत्रू

शनिवारपासून (२७ ऑगस्ट) आशिया कपला सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. अशात राहुल द्रविडचा कोरोना पॉझिटिव्ह आढळणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. पण जर राहुल द्रविड आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये सामील झाला नाही तर व्हीव्हीएस लक्ष्मण रोहित शर्मासोबत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com