120 बॉलमध्ये 314! नेपाळच्या फलंदाजांचा टी-20 मध्ये धमाका; अनेक वर्ल्ड रेकॉर्ड तोडले

120 बॉलमध्ये 314! नेपाळच्या फलंदाजांचा टी-20 मध्ये धमाका; अनेक वर्ल्ड रेकॉर्ड तोडले

आशियाई गेम्स 2023 मध्ये नेपाळच्या फलंदाजांनी मंगोलियाविरुद्ध तुफानी फलंदाजी केली आहे. यासोबतच अनेक रेकॉर्डही नेपाळने तोडले आहेत.

नवी दिल्ली : आशियाई गेम्स 2023 मध्ये नेपाळच्या फलंदाजांनी मंगोलियाविरुद्ध तुफानी फलंदाजी केली आहे. यासोबतच अनेक रेकॉर्डही नेपाळने तोडले आहेत. यात वेगवान शतक आणि अर्धशतक ठोकण्याचा विक्रमाचा समोवेश आहे. नेपाळची फलंदजी पाहून सर्वच जण आश्चर्यचकीत झाले असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या सामन्यात नेपाळचा फलंदाज कुशल मल्ल व दीपेंद्र सिंग आयरी हिरो ठरला आहे.

120 बॉलमध्ये 314! नेपाळच्या फलंदाजांचा टी-20 मध्ये धमाका; अनेक वर्ल्ड रेकॉर्ड तोडले
भारताला पाचवे सुवर्ण! सिफ्ट कौरची नेमबाजीत कामगिरी

टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम डेव्हिड मिलरच्या नावावर आहे आणि रोहित शर्माच्या नावावर आहे. मिलरने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 35 चेंडूत शतक झळकावले होते. पण आता हा विक्रम नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाच्या नावावर नोंदवला गेला आहे. मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात कुशल मल्लाने ३४ चेंडूत शतक झळकावून धमाका केला आहे. आपल्या डावात कुशल मल्लने 50 चेंडूंत 137 धावांची नाबाद खेळी खेळली. आपल्या या खेळीत नेपाळचा हा फलंदाज 12 षटकार आणि 8 चौकार मारण्यात यशस्वी ठरला. मुल्लाने एकाच वेळी रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरचे रेकॉर्ड तोडले.

याशिवाय नेपाळच्या दीपेंद्र सिंग आयरीने अवघ्या 9 चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंगचा विक्रम मोडीत काढला. यानुसार दीपेंद्र सिंग आयरी आता टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात दीपेंद्र सिंह आयरीने 10 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती, ज्यात त्याने 8 षटकार ठोकले होते.

नेपाळने 20 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 314 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 300 धावा करणारा नेपाळ जगातील पहिला संघ ठरला आहे. नेपाळ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. या सामन्यात नेपाळच्या फलंदाजांनी मिळून एकूण 26 षटकार ठोकले. या सामन्यात फलंदाजांनी 6 चेंडूत 6 षटकारही ठोकले. तर, दुसरीकडे मंगोलियाचा संघ अवघ्या 41 धावांवर बाद झाला आणि नेपाळला 273 धावांनी सामना जिंकण्यात यश आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com