Aus vs ENG Test
AUS VS ENG 5TH TEST DAY 4: ENGLAND STAGES STRONG COMEBACK IN ASHES SERIES

Aus vs ENG Test: पाचवा कसोटी सामना थरारक, इंग्लंडने चौथ्या दिवशी दिला जोरदार प्रतिसाद

England Comeback: पाचव्या एशेज कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्या दिवशी जोरदार कमबॅक करत ११९ धावांची आघाडी घेतली. बेन स्टोक्स दुखापतीत असून अंतिम दिवसावर संघाची रणनीती निर्णायक ठरेल.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असलेली एशेज कसोटी मालिकेची सांगता गुरुवारी होणार आहे. पाचव्या आणि शेवटच्या कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून, ऑस्ट्रेलियाचं पारडं जड दिसत असलं तरी इंग्लंडने कमबॅक करत ११९ धावांची आघाडी मिळवली आहे. दोन विकेट हातात असलेल्या इंग्लंडकडे उद्या पाचव्या दिवशी ९० षटकांचा खेळ आहे. जेकॉब बेथल नाबाद १४२ वर खेळत असून, मॅथ्यू पॉट्स ० वर सोबत आहे.

पहिल्या डावात इंग्लंडने सर्व गडी गमावून ३८४ धावा केल्या. पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ५६७ धावांची मजल मारली आणि १८३ धावांची आघाडी घेतली. फॉलोऑनमध्ये इंग्लंडने ८ विकेट गमावून ३०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ब्यू वेबस्टरने दुसऱ्या डावात ३ विकेट घेत कमाल कामगिरी केली. चौथ्या दिवसानंतर बोलताना वेबस्टर म्हणाला, "आम्हाला शक्य तितक्या लवकर हे शेवटचे दोन विकेट हवेत. सकाळी धावा काढण्याची संधी मिळेल की नाही याची खात्री नाही, पण टॉप चार फलंदाजांपेक्षा जास्त विकेट लागणार नाहीत."

इंग्लंडकडे उद्या २०० धावांपर्यंत मजल मारण्याची संधी आहे, तर ऑस्ट्रेलिया १५० धावांमध्ये दोन विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. जर इंग्लंड १५० धावांखाली बाद झाला तर ऑस्ट्रेलिया मालिका ४-१ ने जिंकेल. दरम्यान, इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्सला चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना उजव्या मांडीला दुखापत झाली. फॉलो-थ्रू करताना थांबला आणि फलंदाजीत फक्त १ धाव करून बाद झाला.

उद्या तो गोलंदाजी करेल की नाही, याबाबत शंका आहे. एशेजच्या या इतिहासप्रसिद्ध द्वंद्वाची सांगता रंगतदार होण्याची शक्यता आहे. इंग्लंडची पहिल्या सत्रातील कामगिरी निर्णायक ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com