WTC Final 2023Team Lokshahi
क्रीडा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ट्रॅाफीवर ऑस्ट्रेलियाने संघाने कोरले नाव; 209 धावांनी केला भारताचा पराभव
भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब कामगिरी करत आपल्या विकेट दिल्या, त्यामुळेच भारताला पराभवाचा सामना करावा लगला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमध्ये होता. आज या अंतिम टेस्ट सामन्याचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या डावात 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने आपला डाव 234 धाावांवर आटोपला. 209 धावांनी भारताचा पराभव करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या ट्रॅाफीवर ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपले नाव कोरले. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी खराब फटकेबाजी करत आपल्या विकेट फेकल्या, त्यामुळेच भारताला पराभवाचा सामना करावा लगला.