Australia vs India Travis Head Record: हेडची भारतीय गोलंदाजांना पुन्हा टशन! ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी

Australia vs India Travis Head Record: हेडची भारतीय गोलंदाजांना पुन्हा टशन! ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी

गाबा कसोटीत ट्रॅव्हिस हेडची भारतीय गोलंदाजांना फटकेबाजी, दुसरे शतक ठोकत 300 धावांचा विक्रम. भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला हेड...
Published by :
Team Lokshahi
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेड भारतीय संघासाठी कर्दनकाळ ठरला आहे. ना सिराज चालला ना बुमराह, ट्रॅव्हिस हेडने भारतीय संघातील गोलंदाजांना चांगलचं धुतलं आहे. या सामन्या दरम्यान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे 75 धावांवर 3 विकेट्स घेत चांगली पकड धरली होती.

त्याने आपले जबरदस्त शतक झळकवत आपल्या खेळीत एकूण 13 चौकार मारून शतक ठोकण्याबरोबरच त्याने टीम इंडियाला बॅकफूटवरही पाठवले. ज्यामुळे तो भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. या मालिकेतील त्याचे हे दुसरे शतक आहे. हेड चालू कसोटीत 300 धावांचा विक्रम करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. हेडचे कसोटी कारकिर्दीतील हे 9वे शतक असून भारताविरुद्धचे एकूण तिसरे शतक आहे. ब्रिस्बेनमध्ये खेळलेल्या गेल्या तीन सामन्यांमध्ये हेड गोल्डन डकचा बळी ठरला आहे.

हेडची भन्नाट फटकेबाजी

पहिल्या दिवशी सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट गमावली नव्हती. मात्र या सामन्यात पहिल्या दिवशी पावसामुळे हा सामना अवघ्या 13.2 षटकांचा झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहने नॅथन मॅकस्विनी आणि उस्मान ख्वाजा या दोघांची विकेट घेतली.

मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे चांगली खेळी खेळत असतानाच 12 धावांवर नितीश कुमार रेड्डीने त्यांना बाद केले. पण नंतर हेडने एन्ट्री केली आणि आपल्या फटकोबाजीने भारतीय संघाच्या गोलंदाजांचा विषयचं संपवला. हेड मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियाने 200 धावांचा टप्पा सहज गाठला आणि यामध्ये 3 शतके आणि 5 अर्धशतकांचा मारा करत त्याने भारताविरुद्ध 1000धावाही पूर्ण केल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com