वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विजय! ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा तब्बल 'इतक्या' धावांनी केला पराभव

वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विजय! ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा तब्बल 'इतक्या' धावांनी केला पराभव

ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे. दिल्लीत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा तब्बल 309 धावांनी पराभव केला.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला आहे.दिल्लीत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा तब्बल 309 धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे.

याआधीही विश्वचषक इतिहासातील धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, मार्च 2015 मध्ये अफगाणिस्तानचा 275 धावांनी पराभव केला होता. मात्र, एकूण एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारताच्या नावावर आहे, जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेचा 317 धावांनी पराभव केला होता.

वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विजय! ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा तब्बल 'इतक्या' धावांनी केला पराभव
मराठमोळ्या अमोल मुजुमदारची भारतीय महिला टीमच्या हेड कोचपदी निवड

या सामन्यात 400 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड्सचा संघ 21 षटकात केवळ 90 धावांवरच गारद झाला होता. सलामीवीर विक्रमजीत सिंगने सर्वाधिक 25 धावा केल्या. याशिवाय एकाही खेळाडूला 20 चा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाने 4 बळी घेतले. तर मिचेल मार्शला 2 यश मिळाले.

तर, या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झंझावाती खेळी करत शतके झळकावली. मॅक्सवेलने 40 चेंडूत विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावून इतिहास रचला आहे. तसेच वॉर्नरने या विश्वचषकात सलग दुसरे शतक झळकावले आहे. हे त्याचे एकदिवसीय विश्वचषकातील एकूण सहावे शतक आहे. अशा प्रकारे त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली

याशिवाय स्टीव्ह स्मिथने 71 धावांची आणि मार्नस लॅबुशेनने 62 धावांची खेळी खेळली. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक ४ बळी घेतले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 जिंकले आहेत. तर दोनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशाप्रकारे तो विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. या मोठ्या विजयासह कांगारू संघाच्या निव्वळ धावगतीमध्ये सुधारणा झाली आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com