टीम इंडियासाठी BCCI ने 125 कोटी रुपये बक्षीस दिली रक्कम

टीम इंडियासाठी BCCI ने 125 कोटी रुपये बक्षीस दिली रक्कम

T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अं
Published by :
Dhanshree Shintre

T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाने इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बीसीसीआयने भारतीय संघाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे जय शाहने सांगितले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतीय संघाचे T20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत असल्याचेही त्याने सांगितले.

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत संघाने असामान्य प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com