IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; 'हा' खेळाडू आयपीएल २०२४ मधून बाहेर

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; 'हा' खेळाडू आयपीएल २०२४ मधून बाहेर

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा एक मॅचविनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आयपीएल (IPL) 2024 ची सुरुवात २२ मार्चपासून होणार आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी अर्धच वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा एक मॅचविनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हॅरी ब्रूकने वैयक्तिक कारणांमुळे इंडियन प्रीमियर लीग 2024 मधून माघार घेतली आहे.

तो इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. आयपीएल लिलावात या फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सने 4 कोटी रुपयांना विकत घेतले. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या लीगमधून मात्र त्याने आता वैयक्तीक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता दिल्ली कॅपिटल्स त्याच्या जागी बदली खेळाडूचा शोध घेत आहे.

हॅरी ब्रूकला 2023 च्या IPL मध्ये सनराइजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याने 11 सामन्यांमध्ये केवळ 190 धावा केल्या होत्या. यात त्याने एक शतक झळकावले होते. 2024 च्या IPL लिलावाआधी त्याला SRH ने रिलीज केले होते. यंदाच्या स्पर्धेत तो दिल्लाकडून खेळणार होता. मात्र त्याने आपले नाव मागे घेतले आहे.

आयपीएल IPL 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सची टीम

ऋषभ पंत (C), डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्टजे, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, इशांत शर्मा, यश धुल, प्रवीण दुबे, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झाय रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक चिकारा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com