ब्राझीलची दक्षिण कोरियावर दणदणीत मात; नेमार ठरला विजयाचा मानकरी
ब्राझीलचा संघ फिफा विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. ब्राझीलनं सलग आठव्यांदा आणि एकूण 17 व्यांदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.प्री-क्वार्टर फायनल सामन्यात ब्राझीलनं दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला.
खेळाच्या सातव्या मिनिटाला व्हिनिसियसनं राफिनहाच्या क्रॉसचं गोलमध्ये रूपांतर केलं आणि ब्राझीलनं 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सहा मिनिटांनी नेमारनं पेनल्टी किकवर गोल करत ब्राझील संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.ब्राझीलचा संघ 4-0 नं आघाडीवर होता.सामन्याच्या 76व्या मिनिटाला पाईक सेउंग-हो यानं संघासाठी पहिला गोल डागला आणि कोरियानं आपलं खातं उघडलं. मात्र त्यांना एकही गोल करता आला नाही.
या सामन्यात विजयाचा मानकरी ठरला तो म्हणजे नेमार, नेमार दुखापतीमुळं दोन सामन्यांसाठी संघाबाहेर होता. पण परत येताच त्यानं आपली छाप पाडली. कालच्या सामन्यात डागलेला गोल ब्राझीलसाठी नेमारनं केलेला 76 वा गोल होता. त्यामुळे देशासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होण्यापासून नेमार फक्त दोन पावलं दूर आहे.