Brett Lee On Mayank Yadav
Brett Lee On Mayank Yadav

मैदानात मयंक यादवची सुसाट गोलंदाजी, 156 km/h च्या वेगानं फेकला चेंडू, ब्रेट ली म्हणाला, "भारताला..."

आयपीएल २०२४ मध्ये मयंक यादवने कमाल केली आहे. २२ वर्षीय गोलंदाजाने आयपीएल २०२४ मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकून धमाका केला आहे.
Published by :

आयपीएल २०२४ मध्ये मयंक यादवने कमाल केली आहे. २२ वर्षीय गोलंदाजाने आयपीएल २०२४ मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकून धमाका केला आहे. मयंकने १५६ किमी वेगानं चेंडू फेकून इतिहास रचला आहे. मयंत आयपीएल इतिहासात १५५+ च्या वेगानं चेंडू फेकणारा भारताचा दुसरा फलंदाज बनला आहे. याआधी असा कारनामा फक्त उमरान मलिकने केला आहे. आयपीएल २०२४ च्या ११ व्या सामन्यात पहिलाच सामना खेळणाऱ्या मयंकने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मयंक यादवच्या वेगवान गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटर ब्रेट ली ने प्रतिक्रिया दिली आहे. मयंकची गोलंदाजी पाहून ब्रेटलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. मयंक यादवच्या रुपात भारताला त्यांचा सर्वात वेगवान गोलंदाज मिळाला आहे. फक्त ब्रेट लीच नाही, तर केविन पीटरसननेही मयंकच्या गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. पीटरसने पोस्ट शेअर करत म्हटलंय, मयंक यादवची गोलंदाजी १५५ kph, इयान विशप खूप खूश होणार, आणखी एक वेगवागन गोलंदाज..!!

मयंकने त्याच्या आयपीएल डेब्यू सामन्यात ४ षटकांची गोलंदाजी केली आणि २७ धावा देत ३ विकेट घेतल्या. लखनऊच्या विजयात मयंकच्या मोलाचा वाटा असल्याने त्याला प्लेयर ऑफ द मॅच किताबाने सन्मानित करण्यात आले. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम शॉन टेटच्या नावावर आहे. शॉन टेटने आयपीएलमध्ये १५७.७१ च्या वेगानं चेंडू फेकण्याचा विक्रम केला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणारे गोलंदाज

शॉन टेट - 157.71 km/h

लॉकी फर्ग्यूसन - 157.3 km/h

उमरान मलिक - 157 km/h

एनरिक नॉर्टजे - 156.22 km/h

मयंक यादव - 155.8 km/h

उमरान मलिक - 155.7 km/h

एनरिक नॉर्टजे - 155.7 km/h

उमरान मलिक - 154.8 km/h

एनरिक नॉर्टजे - 154.7 km/h

डेल स्टेन - 154.4 km/h

कगिसो रबाडा - 154.23 km/h

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com