Jasprit Bumrah: बुमराह झाला 'बाबा';  मुलाचे ठेवले 'हे' नाव

Jasprit Bumrah: बुमराह झाला 'बाबा'; मुलाचे ठेवले 'हे' नाव

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.
Published by  :
Team Lokshahi

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने झालेला आंनद बुमराहने सर्वांसोबत शेअर केला आहे.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी घरातील छोट्या पाहुण्याचे नाव अंगद ठेवलं आहे. म्हणजे बुमराह आणि संजना मुलगा अंगदचे आई-वडील झाले आहेत. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो पोस्ट केला आहे. "आयुष्यातील या नव्या जबाबदारीबद्दल खूष आहे", असं त्याने पोस्टमध्ये लिहीलं आहे.

जसप्रीत आणि संजनाच्या मुलाचं नाव अंगद ठेवलं आहे, बुमराहने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरुन ही माहिती दिली. बुमराह नुकताच क्रिकेटच्या मैदानात परतला होता. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याने टीम इंडियाची कमान सांभाळली होती. त्यानंतर तो आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला रवाना झाला. बुमराहने रविवारी अचानक कोलंबोहून मुंबईला जाणारी फ्लाईट पकडली, वैयक्तिक कारणामुळे आशिया कपमधून माघार घेत असल्याचं त्याने सांगितलं, त्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. आता मात्र सर्व काही चाहत्यांना स्पष्ट झालं असून त्यांनीही बुमराहसाठी आनंद व्यक्त केला आहे.

बुमराहने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये बुमराहने पत्नी आणि मुलाचा हात हातात घेतला आहे आणि त्याने लिहिलं की, "आमचं छोटे कुटुंब आता वाढलं आहे. आमचं हृदय भरुन आलं आहे. आज सकाळी आम्ही आमच्या छोट्या बाळाचं, अंगद जसप्रीत बुमराहचं या जगात स्वागत केलं, आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करण्याची आम्ही वाट पाहू शकत नाही.' बुमराहच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com