T20 World Cup 2024: 'बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो; 'या' माजी दिग्गज वेगवान गोलंदाजाने केले बुमराहचे कौतुक

T20 World Cup 2024: 'बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो; 'या' माजी दिग्गज वेगवान गोलंदाजाने केले बुमराहचे कौतुक

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतासाठी महत्त्वाचा ठरेल, ज्याने या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती.

पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली संघाची पहिली तुकडी येत्या काही दिवसांत न्यूयॉर्कला रवाना होणार आहे. भारतीय संघ या जागतिक स्पर्धेत दोन तुकड्यांमध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहे, कारण संघात समाविष्ट असलेले काही खेळाडू आयपीएल 2024 हंगामातील प्लेऑफ खेळत आहेत. या स्पर्धेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतासाठी महत्त्वाचा ठरेल, ज्याने या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी चमकदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीनेही बुमराहचे खूप कौतुक केले आहे.

बुमराहमध्ये बर्फातही गोलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि तो तसा चांगला आहे. बुमराहमध्ये कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची ताकद आहे. बुमराह टी-20 विश्वचषकासाठी संघात असेल आणि तो शानदार गोलंदाजी करेल. ब्रेट लीने T20 क्रिकेटमध्ये बॉल आणि बॅटमध्ये समान संतुलन राखण्याचा सल्ला दिला आहे. खेळाच्या छोट्या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्या ठेवण्याचे आवाहनही त्यांनी आयोजकांना केले आहे.

बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. या मोसमात जरी त्याच्या संघाची कामगिरी खूपच खराब होती आणि संघाने 14 सामन्यांत चार विजय आणि 10 पराभवांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर राहूनही बुमराहने चांगली कामगिरी केली. बुमराहने या मोसमात 13 सामन्यांमध्ये एकूण 20 विकेट घेतल्या आणि या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 6.48 होता. बुमराह विश्वचषकात टीम इंडियासाठी वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल आणि नवीन चेंडूने संघाला यश मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com