SRH vs KKR, IPL 2024 Final
SRH vs KKR, IPL 2024 Final

IPL 2024 Final : KKR वर दिग्गज रॅपरने लावला कोट्यावधी रुपयांचा सट्टा, सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज नव्या चॅम्पियन संघाची नोंद केली जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा फायनलचा सामना रंगणार आहे.
Published by :

Rapper Drake Bet On KKR : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज नव्या चॅम्पियन संघाची नोंद केली जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलचा फायनलचा सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार असून दोन्ही संघ या महामुकाबल्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच दिग्गज रॅपर ड्रेकने केकेआरच्या विजयावर मोठा सट्टा लावला आहे. पण जर सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात विजय झाला, तर ड्रेकला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागेल.

ड्रेकने केकेआरवर लावला कोट्यावधी रुपयांचा सट्टा

कॅनडाचा रॅपर ड्रेकने केकेआरच्या विजयावर २ लाख ५० हजार अमेरिकन डॉलरची बेट लावली आहे. क्रिकेटमध्ये लावलेला ड्रेकचा हा पहिला सट्टा आहे. बेटिंगमध्ये ड्रेकला खूप आवड आहे. क्रिकेटशिवाय त्याने अन्य खेळांमध्येही अशाप्रकारचे मोठे सट्टे खेळले आहेत. ड्रेकने केकेआरवर सट्टा लावल्यानंतर त्याचा स्क्रिनशॉट अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने सट्टा लावल्यानंतर हा सामना पाहण्याचा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

बेटिंगमध्ये सक्रिय राहणाऱ्या ड्रेकने मागील काही महिन्यांपासून अनेक खेळांवर सट्टा लावला आहे. त्याने कॅनसस सिटी चीफवर सुपर बॉलमध्ये २.३४ मिलियन डॉलरचा सट्टा लावला होता आणि ड्रेकने तो जिंकला होता. आता केकेआर आयपीएलच्या फायनलमध्ये जिंकली, तर ड्रेकला ४ लाख २४ हजार डॉलरचा फायदा होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com