MS Dhoni, IPL 2024
MS Dhoni, IPL 2024

धोनीनंतर CSK च्या कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार ? सीईओ विश्वनाथन म्हणाले, "अंतर्गत चर्चा..."

धोनीच्या निवृत्तीनंतर सीएसकेची कमान कोण सांभाळणार? असा प्रश्न क्रीडाविश्वात निर्माण झाला आहे. यावर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
Published by :

एम एस धोनीच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने विजयी झेंडा फडकवला आहे. मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक वेळा जेतेपद मिळवणाऱ्या सीएसकेसाठी भविष्यात नव्या कर्णधाराचं आव्हान असणार आहे. धोनीच्या आयपीएलच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेल्या असतात. यंदा होणाऱ्या आयपीएलमध्ये सीएसकेचं नेतृत्व धोनीचं करणार आहे. परंतु, धोनीच्या निवृत्तीनंतर सीएसकेची कमान कोण सांभाळणार? असा प्रश्न क्रीडाविश्वात निर्माण झाला आहे. यावर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.

विश्वनाथन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय, "अंतर्गत चर्चा झालेली आहे. परंतु, श्रीनीवासन यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. सीएसकेच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत कर्णधार आणि प्रशिक्षक निर्णय घेतील आणि आम्हाला याबाबत निर्देश देतील. तोपर्यंत आम्हाला धीर ठेवावा लागणार आहे. नवीन हंमाम सुरु झाल्यावर सीएसके नव्या जोमानं पुन्हा एकदा मैदानात उतरेल. नॉकआऊटमध्ये क्वालीफाय होण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. हा आमचा पहिला लक्ष्य आहे.

आम्ही आताही या गोष्टींचे पालन करत आहोत. प्रत्येक हंमाम सुरु होण्यापूर्वी एम एस धोनी आम्हाला सांगतो की, आधी आम्हाला लीगवर फोकस करु द्या. आम्ही नॉक आऊटसाठी क्वालीफाय करण्याचा प्रयत्न करणार. दबाव आहे, पण मागील काही वर्षापासून सातत्य असल्याने काही खेळाडूंना या गोष्टींची सवय झाली आहे."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com