Suryakumar Yadav : सूर्यामध्येही लपलाय एक चेन्नईचा चाहता! सूर्याच्या इंस्टा स्टोरीमध्ये का झळकला पिवळा भंडारा; CSK
सूर्यकुमार यादव अनेक वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळत असून त्याने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरीही केली आहे. त्याने 6 सामन्यांमध्ये 47.80 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत. मात्र सुर्याच्या निळ्या आकाशात अचानक पिवळ्या भंडारा उडताना दिसत आहे. काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स हा सामना रंगला या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत लखनऊने चेन्नईला 167 धावांचे आव्हान दिले होते.
या धावांचा पाठलाग करत चेन्नईने 168 धावा करत लखनऊला पराभूत केलं होत. यावेळी सामन्यानंतर CSK चा वियज पाहून सूर्यामध्ये लपलेला चेन्नईचा चाहता अचानक त्याच्या इंस्टा स्टोरीमधून पाहायला मिळाला. सर्वात आधी त्याने आयुष म्हात्रेसाठी आनंद व्यक्त करणारी स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली. ही स्टोरी शेअर करत त्याने पुढे लिहलं होत की, 'खूप छान'. चेन्नईने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या 17 वर्षीय आयुष म्हात्रेला 30 लाखांमध्ये आपल्या संघात सामिल केले आहे. याबद्दल चेन्नईने पोस्ट करून माहितीही दिली आहे.
तसेच पुढे शिवम दुबे आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या भागीदारीची फिरकी घेत त्याने आणखी एक स्टोरी पोस्ट केली. ज्यात सुर्याने दोघांना फोटो शेअर करत दोघांमधले संभाषण देत कॅप्शन लिहिले. ज्यात लिहले आहे की, "माही भाई- स्ट्राईक दिल्यानंतर तु करून घेशील का?, दुबे- ट्राय करेन, माही भाई- ट्राय करायचं असेल तर मीच करेन, तू फक्त रन आऊट करू नकोस" अशा प्रकारचं संभाषण त्यात लिहले आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स या सामन्यात चेन्नईच्या शेख राशिद आणि रचिन रवींद्र यांची सलामीवीरीची कामगिरी पाहायला मिळाली. शेख राशिदने 27 तर रचिनने 37 धावा करत अर्धशतकी भागीदारी केली आणि संघासाठी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर महेंद्र सिंग धोनी आणि शिवम दुबे यांची आक्रमक भागीदारी पाहायला मिळाली. धोनी 26 धावांवर नाबाद, तर दुबे 43 धावांवर नाबाद राहिला, असं करत दोघांनी 57 धावांची भागीदारी केली.