India vs New Zealand Match : विराट कोहलीची विकेटनंतर अनुष्का शर्माच्या
प्रतिक्रियेने वेधले लक्ष

India vs New Zealand Match : विराट कोहलीची विकेटनंतर अनुष्का शर्माच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष

विराटची विकेट गेल्यानंतर अनुष्काच्या निराशेने सर्वांचे लक्ष वेधले
Published by :
Team Lokshahi
Published on

रविवार 2 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा शेवटचा सामना पार पडत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे. या सामान्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर न्युझीलंड संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला अडचणीत आणले. विराटने मारलेला चेंडू ग्लेन फिलिप्सने पकडल्यानंतर अनुष्का शर्माने असे काही केले ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले.

नाणेफेक गमावल्यानंतर, टीम इंडिया फलदांजी करण्यासाठी आली. भारतीय संघाने आतापर्यत 30 धावा केल्या असून, 3 विकेट गमावल्या आहेत. यामध्ये विराटची विकेट गेल्यानंतर अनुष्का शर्माच्या कृतीने सगळ्याचे लक्ष वेधले. अनुष्काने नक्की काय केले जाणून घेऊया.

काय केले अनुष्काने?

14 चेंडूत 11 धावा काढल्यानंतर विराट कोहली पूर्णपणे सेट झाला होता, त्यानंतर मॅट हेन्रीच्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटवर येऊन विराटने एरियल शॉट मारला. जो हवेत उडाला न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्सने हा चेंडू पकडला आणि विराटची विकेट घेतली. कोहली अशा प्रकारे विराटची विकेट गेल्यानंतर अनुष्का शर्मा खूपच निराश पाहायला मिळाली. यामुळे तीने डोक्याला हात लावला. अनुष्काचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com