Ajinkya Rahane Viral Video: "काय फालतू बॅटिंग केली ना..." रहाणे-अय्यरची मराठीत रंगली चर्चा, व्हिडिओ व्हायरल
काल झालेल्या सामन्यानंतर अजिंक्य राहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यातील रंगलेला मराठीतला संवाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्यस या दोन्ही संघाचे कर्णधार मुंबईचे आहेत. तसेच अजिंक्य राहणेला बऱ्यापैकी चांगली मराठी भाषा बोलता येते. या सामन्यात कोलकाताचा आश्चर्यकारक पराभव झाला. यानंतर दोन्ही संघ मैदानात हात मिळवणी करण्यासाठी मैदानात आले.
त्यावेळी अजिंक्य रहाणे श्रेयस अय्यरसमोर हसतमुखपणे आला आणि म्हणाला की," काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही" त्यांच्यामध्ये झालेला हा संवाद मैदानात असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर या त्यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे हे दोघे ही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. या दोघांनी मुंबईच्या देशांतर्गत संघाकडून एकत्र सामने खेळले आहेत. एवढचं नाही तर दोघे ही मुंबईकर आहेत. त्यामुळे अनेकदा दोघांमध्ये मराठीतून संवाद होताना दिसून येतो. त्याचप्रमाणे त्यांच्या या संवादाने देखील सोशल मीडियावर जोर धरला आहे.
अजिंक्य रहाणेने गेतली कोलकाता संघाच्या पराभवाची जबाबदारी
कालच्या सामन्यात झालेल्या कोलकाताच्या पराभवाची जबाबदारी कोलकता नाईट रायडर्यस संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने घेतली आहे. तसं त्याने स्वतः मान्य देखील केलं आहे. सामना झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देत रहाणे म्हणाला की," मी चुकलो. संघाच्या पराभवाची जबाबदारी मी घेतो, मी चुकीचा शॉट मारला. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरु होत्या. मला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. आमची फलंदाजी खुप खराब होती. विकेट सोपी नव्हती तरीही 111 धावांचा सामना करणं आम्हाला शक्य झालं नाही. गोलंदाजांनी खुप चांगला खेळ केला. पण आम्ही काही प्रमाणात बेजबाबदारपणा दाखवला. त्याबद्दल मी सध्या फार निराश आहे".
पंजाबचा कमी धावात यशस्वी बचाव
काल पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्यस यांच्यामध्ये झालेल्या सामन्यादरम्यान पंजाबचा संघ अवघ्या 15.3 ओव्हर्समध्ये ऑल आऊट झाला असून त्यांनी फक्त 111 धावा करत केवळ 112 धावांच आव्हान कोलकाताला दिलं आहे. पंजाबकडून फलंदाजीसाठी प्रभसिमरनने सर्वाधिक 30 धावा केल्या, तर प्रियांश आर्याने 22 धावा केल्या. कालच्या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी अशी काही फिरकी केली की, कोलकाता अवघ्या 96 धावांत गारद झाला. पंजाबने सर्वात कमी धावसंख्या करूनही कोलकाताच्या सलामवीरांना गार केलं. पंजाब किंग्सने आयपीएलमध्ये सर्वात छोट्या लक्ष्याचा यशस्वी बचाव करण्याचा विक्रमही केला.
अजिंक्य रहाणेची 'ती' चुक पडली महागात
पंजाबने दिलेल्या धावांचा पाठलाग करत असताना कोलकाताकडून अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्यात अर्धशतकी भागीदारी पाहायला मिळाली. ज्यावेळी चहलने 8 व्या ओव्हरमध्ये फिरकी टाकली त्यावेली अजिंक्य रहाणे स्वीप मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याची ही चुक संघासाठी महागात पडली. कारण त्यावेळी चेंडू त्याच्या पॅडला लागला होता त्यामुळे असं वाटत होत की, तो आऊट झाला आहे. मात्र जेव्हा रिप्ले पाहण्यात आला, त्यावेळी रहाणेला टाकलेल्या चेंडूचा इम्पॅक्ट आऊटसाईड ऑफ स्टंप होता. त्याने डीआरएस न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला. रहाणेची विकेट ही संघासाठी फार घातक ठरली कारण लगेच 95 धावांवर संपुर्ण संघ ढेपाळला.