Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध सामना रद्द करण्याची विरोधकांची मागणी जोर धरत आहे. आज भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "खेळाकडे खेळाच्या नजरेने बघावं, की नाही बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. संविधानाने आणि डॉ. बाबासाहेबांच्या घटनेने आपल्याला अधिकार दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचे निमित्त हे विरोधक पाहत असतात".
"फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करु नये असं माझं आव्हान आहे आणि अशी माझी विनंती आहे. मॅच बघायला मला शक्य होणार नाही कारण आज 9 ते 10 वाजेपर्यंत माझे कार्यक्रम आहेत. तुम्ही आग्रह करत आहात म्हणून मला वेळ मिळाला तर मॅच बघतो". अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.