क्रिकेट
Glenn Maxwell Retirement : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल वन डे मधून निवृत्त
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेटविश्वाला आणि आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेटविश्वाला आणि आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. मॅक्सवेलने त्याच्या 13 वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीला निरोप दिला आहे. मॅक्सवेलने आज ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली, 2012 मध्ये पदार्पणापासून त्याने त्याच्या 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास 4,000 धावा केल्या आहेत.