Asia Cup 2025 : फिटनेसवर ठरवणार टीम इंडियाचा संघ! श्रेयसला दिलासा, सूर्यादादा अजूनही वेटिंगवर, तर हार्दिकसाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीने संपवल्यानंतर टीम इंडिया आता आशिया कप 2025 साठी सज्ज झाली आहे. हि बहुप्रतिक्षित स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा 21 दिवस चालणार आहे. याचपार्श्वभूमिवर भारतीय टीम इंडियाच्या संघाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. टीम इंडियाच्या अंतिम संघाची घोषणा फिटनेस टेस्टचे निकाल येताच केली जाईल. अशातच आता बीसीसीआय खेळाडूंच्या फिटनेस रिपोर्टवरही विशेष लक्ष ठेवत आहे.
टीम इंडियातील स्टार खेळाडू हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांची फिटनेस सामन्यातील भूमिका ठरवण्यात निर्णायक ठरणार आहे. यावेळी तिघांच्याही फिटनेससंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वात आधी श्रेयस अय्यरच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 27 ते 29 जुलै दरम्यान झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली.
त्याचसोबत हार्दिक पांड्याबद्दल बोलायचं झाल तर, त्याच्यासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याचं म्हटल जात आहे. त्याची देखील 11 आणि 12 ऑगस्टला फिटनेस टेस्ट बंगळुरूमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या चाहत्यांसाठी पुढील काही तास धाकधूक वाढवणारे ठरु शकतात.
तसेच सूर्यकुमार यादवबाबतचा निकाल अजूनही वेटिंगवर आहे. टी20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव काही काळापूर्वी हर्नियाच्या शस्त्रक्रियेमुळे बाहेर गेला आहे. तो फिट होतोय मात्र अजूनही त्याच्या पूर्ण तंदुरुस्तीबाबत निश्चितता नाही. त्याचप्रमाणे प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही या स्पर्धेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे हे दोघे अनुभवी खेळाडू एशिया कपपासून दूर राहण्याची शक्यता आहे.