Champions Trophy 2025 IND Win : नाद करा पण टीम इंडियाचा कुठं! अखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपल नाव कोरलं

Champions Trophy 2025 IND Win : नाद करा पण टीम इंडियाचा कुठं! अखेर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपल नाव कोरलं

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: टीम इंडियाचा विजय, भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले.
Published by :
Prachi Nate
Published on

25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रंगताना पाहायला मिळत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची फायनल आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू झाला असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी न्यूझीलंडकडून सर्वात आधी विल यंग आणि रचिन रविंद्र ही जोडी ओपनींगसाठी फलंदाजी करण्याासठी मैदानात आली. सुरुवातीला किवी संघाकडून षटकार आणि चौकारासह जोरदार फलंदाजी पाहायला मिळाली. अस असताना टीम इंडियाचे गोलंदाज त्यांच्या भेदक गोलंदाजीसह किवी टीमवर भारी पडले आहेत. न्यूझीलंडने 7 गडी गमावत भारताला 252 धावांचे आव्हान दिले. अखेर टीम इंडियाने आपल्या जोरदार खेळीने न्यूझीलंडचा दारुण पराभव केला आहे.

टीम इंडियाच्या गोलंदाजाचा कहर

सुरवातीलाच वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीने विल यंगची पहिली विकेट घेतली. त्यानंतर कुलदीपच्या भरधाव बॉलची जादू पाहायला मिळाली कुलदीपने गोलंदाजीसाठी येताच पहिल्या बॉलमध्ये रचिन रविंद्रचा त्रिफळा उडवला त्यानंतर लागोपाठ त्याने केन विल्यमसनला ही आल्यापाऊली माघारी पाठवले. त्यानंतर 'सर' जडेजाने टॉम लॅथमचा 14 धावांसह बळी घेतला अन् भारताच्या खात्यात 4 विकेट जमा झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा वरुणचा चक्रव्युह किवी टीमवर भारी पडला वरुणने ग्लेन फिलिप्सला 34 धावांवर बाद केले. 44 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा अर्धा संघ कोसळलेला पाहायला मिळत असताना, मिचेल एकटाच भारतीय संघाविरूद्ध खेळताना दिसत होता. त्यानंतर शामीने डॅरिल मिचेलची विकेट घेत भारतासाठी मोठी कामगिरी केली. अन् अखेर न्यूझीलंडला भारताकडून सातवा धक्का मिळाला, न्यूझीलंचा कर्णधार मिशेल सँटनरला किंग कोहलीने रनआऊट केलं. मात्र अक्षरच्या 35 व्या ओव्हरमध्ये रोहितने मिड विकेटवर आणि जडेजाच्या 36 व्या ओव्हरमध्ये गिलने सीमारेषेवर झेल सोडला. दोन्ही झेल इतके सोपे नव्हते पण दोघांनीही चांगला प्रयत्न केला.

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपल नाव कोरल

टीम इंडियाकडून ओपनींगसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. यानंतर रोहित शर्माने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 41 बॉलमध्ये 5 चौकार, 3 षटकारांसह झंझावाती अर्धशतक झळकावले. यानंतर शुभमन गिल हा सँटनरच्या 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर झेलबाद झाला. गिलने 50 बॉलमध्ये एका षटकारासह 31 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर कोहली मैदानात येताच चाहत्यांच्या अपेक्षा वाढू लागल्या मात्र, मायकेल ब्रेसवेलच्या 20 ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विराट कोहली पायचीत झाला. यानंतर रोहितला श्रेयस अय्यरची भागिदारी मिळाली. रोहित शर्मा शतक करेल असं चाहत्यांना वाटू लागताच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. 27 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा स्टंपिंग झाला आणि रोहित मोठा फटका खेळण्यासाठी पुढे गेला ज्यामुळे बॉल थेट लॅथमच्या हातात गेला.

रोहित शर्माने भारतीय संघाचा कर्णधार म्हणून वनडेमध्ये 2500 धावांचा पल्ला गाठला आहे. टीम इंडियाने गेल्या 17 धावांमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात ३४ धावांची नाबाद खेळी खेळून टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर ठेवत राहुल नाबाद परतला. यावेळी त्याला हार्दिक पंड्याचीही साथ लाभली ज्याने १८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. जडेजाने ४९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या विजयासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद तिसऱ्यांदा पटकावणारा पहिला संघ ठरला. यासह भारताने गेल्या १० महिन्यात दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकत ट्रॉफी आपल्या नावे केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com