Champions Trophy 2025 : भारतचा शानदार विजय, विराट कोहलीचं शतक
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दुबई येथे शानदार सामना बघायला मिळाला. या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानाला धूळ चारली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी भारताला 242 धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात 6 विकेट्स राखून भारताने विजय मिळवला आहे.
फलंदाजी करताना बाबर आझमने चांगली सुरुवात करुन दिली. मात्र नंतर त्यांचा खेळ बिघडत गेला. 47 धावांमध्ये 2 विकेट्स गमावल्या नंतर मोहम्मद रीझवान आणि सौद शकिल यांनी मिळून पाकिस्तानसाठी 104 धावा केल्या.मात्र नंतर त्यांची खेळी बिघडत गेली आणि एकामागोमाग एक विकेट जाण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पाकिस्तान संघाला अधिक अधिक धावा करता आल्या नाहीत.
या सामन्यात विराट कोहलीने नाबाद शतकी खेळी केली. यासह भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतावरील टेन्शन कमी झालं आहे. तर पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
विराट कोहलीने 27 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं . विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरलं. तसेच विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराटने 287 डावात ही कामगिरी केली. विराटने 13 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर सिंगल घेत 14 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.