DC Vs LSG IPL 2025 : DC Vs LSG आमनेसामने भिडणार! कोणाचं पारडं पडणार भारी?
आयपीएलला सुरुवात झाली असून आतापर्यंत तीन सामने पार पडले असून आरसीबी, एसआरएच आणि सीएसके या संघांनी आपलं खात उघडलं आहे. तर आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये चुरस लढताना पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीच्या होम ग्राउंडवरचा असला तरी हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.
गेल्या हंगामानंतर दोन्ही संघात मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या आजवरच्या प्रवासात रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. तर आयपीएलच्या लिलावात लखनऊ संघाने रिषभवर तब्बल 27 कोटींची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं होत. त्यामुळे आता रिषभ लखनऊचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
तर दुसरीकडे गेल्या तीन हंगामांत लखनऊ संघाचे कर्णधारपदाची धुरा संभाळणारा केएल राहुल आता दिल्ली संघाचा भाग झाला असून अक्षर पटेल दिल्ली संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे . त्यामुळे यावेळी दोन्ही संघांच्या नवनेतृत्वाचा कस लागणार आहे. तसेच दिल्लीकर आणि लखनऊकर ऋषभ पंत आणि केएल राहुल आपल्या माजी संघाविरुद्ध कशी कामगिरी करतात याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.