DC Vs LSG IPL 2025 : दिल्लीची डुबती नैय्या किनाऱ्यावर आणली अन् आशुतोष पहिल्याच समान्यात ठरला DC च्या ऐतिहासिक विजयाचा हिरो

DC Vs LSG IPL 2025 : दिल्लीची डुबती नैय्या किनाऱ्यावर आणली अन् आशुतोष पहिल्याच समान्यात ठरला DC च्या ऐतिहासिक विजयाचा हिरो

आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा ऐतिहासिक विजय, आशुतोष शर्मा ठरला हिरो, पहिल्याच सामन्यात दिल्लीने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत केले.
Published by :
Prachi Nate
Published on

आयपीएलचा संग्राम सुरु झाली आहे अशातच काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला, विशेष म्हणजे या दोन्ही संघातील कर्णधारांची अदलाबदली झाली आहे. काल अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली तसेच दिल्ली संघाचा इमपॅक्ट प्लेअर आशुतोश शर्मा याच्या जोरावर दिल्ली कॅपिट्ल्सने विजय मिळवून आयपीएलच्या 18 व्या सिझनमध्ये आपलं खात उघडलं आहे. लखनऊने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला 210 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीने एका विकेटने स्विकारत विजय मिळवला आहे. तसेच दिल्लीने 19.3 ओव्हरमध्ये 211 धावा केल्या.

दिल्लीच्या ताफ्यात नवा फिनिशर

यावेळी दिल्लीसाठी आशुतोष हा खरा हिरो ठरला त्याने दिल्लीसाठी नाबाद अर्धशतकी खेळी खेळत 31 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 66 धावा केल्या. दिल्लीचा संघ 10 ओव्हरमध्येच ढेपाळला होता. मात्र, आशुतोष आणि विपराज या दोघांनी अडचणीत सापडलेल्या दिल्लीला पहिल्या सामन्यात विजयाचा झेंडा रोवण्यास मदत केली.

दिल्लीचा अनपेक्षित कमबॅक

सुरुवातीलाच 29 धावांवर फाफ डु प्लेसीस बाद झाला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा या दोघांनी मैदानात 48 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स 22 बॉलमध्ये 34 धावा करून माघारी परतला. नंतर विपराज निगमच्या साथीने 23 बॉलमध्ये 55 धावांची भागीदारी करत आशुतोषने दिल्लीला अवघड वाटणारा विजय मिळवून दिला. तसेच लखनऊकडून शार्दूल ठाकुर, एम सिद्धार्थ, दिग्वेश राथी, रवी बिश्नोई या चौघांनी दिल्लीचे प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. मात्र, आशुतोष दिल्लीसाठी नवा फिनिशर ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com