Digvesh Rathi : अरे तु सुधरणार कधी? BCCI ने दंड ठोठावला तरी IPL मधील 'त्या' खेळाडूमध्ये काहीच बदल झाला नाही; नव्या अडचणीत वाढ
आयपीएल 2025 मधील स्टार खेळाडू दिग्वेश राठी हा लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना पाहायला मिळाला. यादरम्यान त्याचं नोटबुक सेलीब्रेशन खूपच चर्चेत राहिलं होतं. त्याच्या आक्रमक प्रवृत्तीमुळे त्याला आयपीएलमधील एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलं होत. एवढचं नाही तर त्याला सामना शुल्काच्या 50 टक्के दंड देखील ठोठावण्यात आला होता. मात्र एवढ सगळ होऊन देखील त्याने सध्या सुरु असलेल्या दिल्ली प्रीमियर लीग 2025मध्ये तीच चूक केली आहे.
दिल्ली प्रीमियर लीगदरम्यान, साउथ दिल्ली सुपरस्टार्स आणि वेस्ट दिल्ली लायन्स यांच्यात दिल्ली प्रीमियरल लीग स्पर्धेचा सातवा सामना खेळला गेला. या दरम्यान साउथ दिल्ली सुपरस्टार्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी आणि दिल्ली लायन्सचा ओपनर अंकित कुमार यांच्यात वाद झाला. जी ट्रीक आयपीएलदरम्यान दिग्वेश राठीने वापरली होती तिच पुन्हा दिल्ली प्रीमियरल लीग स्पर्धेत दिल्ली लायन्सच्या डावातील पाचव्या षटकात वापरली.
झालं असं की, त्याने दिल्ली लायन्सच्या डावातील पाचव्या षटकात अंकितची ट्रिगर मूव्हमेंट पाहून बॉल टाकताना थांबला. त्यानंतर राउंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी दिग्वेश राठी सज्ज झालेला असताना बॉल टाकणार इतक्याच अंकित बाजूला झाला. त्यामुळे दोघात वाद झाला. त्या दोघांमधील झालेली ही बाचाबाचीची व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर आयपीएल 2025मध्ये दिग्वेश राठी लखनौ सुपर जायंट्स संघाकडून चांगाली गोलंदाजी करताना दिसला त्यामुळे पुढच्या पर्वातही तो या फ्रेंचायझीकडून खेळताना दिसेल अशी शक्यता आहे.