CSK Vs RR IPL 2025 : धोनीला पाहताच वाकला अन् संस्कारांचे "वैभव" पाहायला मिळाले;  पाहा 'हा' व्हिडिओ

CSK Vs RR IPL 2025 : धोनीला पाहताच वाकला अन् संस्कारांचे "वैभव" पाहायला मिळाले; पाहा 'हा' व्हिडिओ

CSK VS RR या सामन्यादरम्यान वैभव सुर्यवंशी महेंद्र सिंग धोनीच्या पाया पडला, व्हिडिओ व्हायरल.
Published by :
Prachi Nate
Published on

(Vaibhav Suryavanshi Touches Feet Of MS Dhoni) दिल्लीच्या अरुण जेटली या मैदानात राजस्थानने चेन्नईने 6 गडी बाद तर 17 बॉल राखून 188 धाावंसह पराभूत केलं आहे. प्रथम गोलंदाजी करत राजस्थानने सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईने पहिला फंलदाजी करत 187 धावा केल्या. या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवशीनं 33 बॉलमध्ये 4 षटकारांसह 57 धावा करत अर्धशतकी खेळी केली.

त्यामुळे चेन्नईला हरवत राजस्थानने हा सामना जिंकून स्पर्धेची सांगता विजयासह केली. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा 14 वर्षीय वैभव सूर्यवशी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आला आहे. यावेळी CSK VS RR या सामन्यादरम्यान देखील वैभव चर्चेत आला आहे. मात्र यावेळी खेळासोबत त्याचे संस्कार देखील क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाले आहेत.

सामना संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हात मिळवणी करण्यासाठी मैदानात आले. त्यावेळेस वैभव सूर्यवशी धोनीला पाहताच खाली वाकला आणि आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तसेच चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीच्या पायाला हात लावून त्याचे आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळालं.

यादरम्यान त्याचे संस्कार मैदानावर पाहायला मिळाले. त्याच्या कृतीमुळे वैभवला धोनीसंदर्भातील आदर असल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत असून सुर्यवंशीवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छा आणि कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच वैभव सुर्यवंशी आणि महेंद्र सिंग धोनी या दोघांचा हा क्षण कालच्या सामन्यादरम्यान लक्षवेधी ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com