Virat Kohli IPL 2025 : 'त्या' एका कृतीतून विराटने आपला छोटेपणा दाखवून दिला; पंजाबविरुद्ध सामन्यात नेमकं का घडलं?
पंजाबच्या मैदानावर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या क्वालिफायर 1 दरम्यानच्या सामन्यात विराट कोहलीच्या एका कृतीने क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा निर्माण केली. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने पंजाबच्या एका ज्यूनियर खेळाडूचा अपमान केला. 20 वर्षाचा मुशीर खान हा पंजाब किंग्ज संघाचा एक खेळाडू आहे. तो क्वालिफायर 1 सामन्यादरम्यान 9 व्या ओव्हरसाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता.
त्यावेळेस त्याच्या मागे फिल्डिंगसाठी उभा असलेल्या विराट कोहलीने त्याला "हा पाणी घेऊन येणारा आहे" असं म्हणत टोमणा मारला आणि त्याची खिल्ली उडवली. विराट कोहलीला क्रिकेटमधील जनक म्हणून ओळखतात त्याला किंग कोहली म्हणून देखील म्हटलं जात. विराटचा स्वभाव हा मिश्किल असल्याचं देखील जवळपास सर्व खेळाडूंना आणि क्रिकेट चाहत्यांना माहित आहे.
मात्र आपल्या पेक्षा ज्यूनियर असलेल्या आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुशीर खानबाबत विराटने केलेल्या वक्तव्याने पंजाब संघाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. अलीकडेच विराटने मुशीर खानला एक बॅट दिली होती. मुशीर खान विराटला भैय्या म्हणजे भाऊ बोलतो. मात्र विराटच्या या कृतीने तो पुन्हा ट्रोलिंगच्या जाळ्यात फसल्याचं पाहायला मिळत आहे.