GT VS RR IPL 2025 : गुजरातचा जलवा! घरच्या मैदानावर 200 पार करत राजस्थानला पाजलं पाणी
9 एप्रिल 2025 रोजी गुजरात येथील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना पार पाडला. या सामन्यादरम्यान गुजरातनं आपल्या घरच्या मैदानावर राजस्थानला पाणी पाजलं आहे. हा सामना सुरु होण्याआधी या सामन्यामध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती, आणि गुजरात टायटन्स या संधीचं सोन करताना पाहायला मिळाला.
नाणेफेक हरली असली तरी गुजरातच्या संघाने आपल्या घरच्या मैदानात राजस्थानवर स्वतःचे वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करत असताना गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचे आव्हान दिले होते. ते पुर्ण करण्याचा प्रयत्न करत राजस्थानने 159 धावांवर माघार घेतली. त्यामुळे गुजरातने हा सामना 58 धावांनी जिंकला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात गुजरात केवळ एक सामना हरला आहे, तर 4 सामन्यावर आपला विजय कोरला आहे, त्यामुळे गुजरात स्कोअरबोर्डमध्ये अव्वलस्थानावर पाहायला मिळत आहे.
यावेळी गुजरातचा सुदर्शन राजस्थानवर भारी पडला
अहमदाबादमध्ये पार पडलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात गुजरात टायटन्स संघाच्या साई सुदर्शनची कृपा संघावर झालेली पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीला गुजरातचा कर्णधार शुबमन गिल मैदानात उतरला मात्र तो 2 धावांवर माघारी फिरला. त्यानंतर जोस बटलरच्या साथीने साई सुदर्शनने संघाला सावरलं. त्यानंतर जोस बटलर 36 धावा करत बाद झाला. बटलरच्या नंतर सुदर्शनच्या जोडीला शाहरुख खान आला. त्याने देखील 36 धावांवर मोर्चा सांभाळला.
त्यानंतर सुदर्शन 82 धावांसह दमदार अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 217 धावा करत राजस्थानसाठी 218 धावांचे लक्ष दिले. तर गुजरातचे गोलंदाज देखील कुठे कमी पडले नाही, राशीद खान आणि साई किशोरया यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत. तसेच इतर गोलंदाज म्हणजेच मोहम्मद सिराज, अर्शद खान आणि कुलवंत खेजरोलिया याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. याशिवाय गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णानं 3 विकेट्स घेतल्या.
राजस्थानकडून हलकी खेळी
गुजरातने दिलेल्या 218 धावांचा पाठलाग करत यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन हे दोघे ओपनिंगला आले. यशस्वी जैस्वाल एक चौकार मारत आणि 6 धावा घेत बाद झाला. तर दुसरीकडे संजू सॅमसन 41 धावा तर रियान पराग 26 धावांची खेळी खेळत तंबूत फिरला. यानंतर हेटमायरने 52 धावा करत अर्धशतक केलं. त्याचं अर्धशतक वगळता राजस्थानकडून कोणच मोठा आकडा गाठू शकला नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ 159 धावांवर पराभूत झाला.
गुजरात टायटन्सची प्लेईंग 11
शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, शेरफेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, राशिद खान, अरशद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11 -
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, फजलहक फारूकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.