ICC Women’s World Cup 2025 : पुन्हा तिच परिस्थिती! 'त्या' हस्तांदोलन करणार नाहीत पण..., भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचा पारडं जड
पुरुषांच्या आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर अवघ्या सात दिवसांनी, आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या साखळी फेरीत पुन्हा भारत-पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना आज म्हणजेच रविवार, 5 ऑक्टोबरला श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे पार पाडला जाणार आहे.
दरम्यान यावेळी कोण आपलं पारडं कोणावर भारी पाडणार हे पाहण देखील तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही देशातच अलिकडे पहलगाम हल्ल्यावरुन पुरुष भारतीय संघाने आशिया कप 2025 स्पर्धेतील पाकिस्तानसोबतच्या पहिल्या सामन्यात त्यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.
बीसीसीआयने तसे भारतीय संघाला निर्देश दिले होते. त्यामुळे आशिया कपमधील तणावाची परिस्थिती पाहता महिला विश्वचषक 2025 च्या साखळी फेरीत देखील अशीच परिस्थिती येण्याची शक्यता वर्तावली जात आहे. परंतु या सामन्यात भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकमेकांसमोर येणार नाहीत तर दोन्ही संघांच्या कामगिरीची पातळीही तुलनात्मक असणार नाही.
दरम्यान विजयाची बाजू बघायची झाली तर, भारतीय संघाने त्यांच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला कोणत्याही अडचणीशिवाय हरवले. तर दुसरीकरडे पाकिस्तानी संघाची सुरुवातच चांगली नव्हती, पहिल्याच सामन्यात त्यांना बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे बऱ्याच संघर्षानंतर त्यांनी पात्रता स्पर्धा जिंकून या स्पर्धेत प्रवेश केला. भारतीय संघ आधीच खूप मजबूत असून या विश्वचषकात जेतेपदाचा दावेदार आहे.
त्यामुळे टीम इंडिया विजयाचा प्रबळ दावेदार आहे हा अंदाज लावणे कठीण नाही. मात्र आशिया कपमधील तणाव महिला विश्वचषकात पसरेल का याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच हवामानाबाबत बोलायचं झालं तर, शनिवारी कोलंबोमध्ये दिवसभर पाऊस पडला, ज्यामुळे श्रीलंका-ऑस्ट्रेलिया सामना रद्द करावा लागला. त्यामुळे आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर देखील पावसाचं सावट असण्याची शक्यता आहे.