Rishabh Pant : BCCI ने ठोठावला ऋषभ पंतला इतक्या रुपयांचा दंड, नेमकं कारण काय? जाणून घ्या..
मंगळवारी आयपीएल लखनौ सुपर जायंट्स LSG च्या कर्णधार Captain ऋषभ पंतने आरसीबीविरुद्ध RCB 118 धावांची शानदार खेळी खेळली. या सामन्यात त्याने शतक ठोकल्यानंतर 'फ्लिप' करून आनंद साजरा केला. कर्णधार ऋषभ पंतने शतक काढून एक मोठा धावांचा आकडा आरसीबी RCB समोर ठेवला होता. मात्र आरसीबीने ही शानदार खेळी करत सामना आपल्या नावावर केला. मात्र या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतला मात्र बीसीसीआय BCCI ने स्लो ओव्हर रेट बद्दल 30 लाखांचा दंड ठोठावला आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओवर रेट slow over rate बद्दल एलएसजी LSG चा कर्णधार ऋषभ पंतला ठोठावण्यात आला. ऋषभने आरसीबीविरुद्धच्या सामन्यादरम्यान निर्धारित वेळेमध्ये षटक पूर्ण केले नाही. आयपीएलच्या किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आचारसंहितेनुसार लखनौ सुपर जायंट्स LSG चा हंगामातील हा तिसरा गुन्हा असल्याने, संघाचा कर्णधार ऋषभ पंतवर 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कर्णधार ऋषभ पंत ने आयपीएल च्या नियमांचे उल्लंघन केले. आयपीएलच्या सामन्यातील हा तिसरा गुन्हा असल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला. तस पाहता आयपीएल IPL 2025 मधील ऋषभची कामगिरी चांगली नव्हती. त्याने कालच्या सामन्यापूर्वी 13 खेळांमध्ये केवळ 151 धावा केल्या होत्या. कालच्या सामन्यात त्याने जरी आकर्षक केली जरी केली असली तरी संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.