LSG vs SRH IPL 2025 : "तुझे केस पकडून..." भर सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात ठसण; व्हिडिओ व्हायरल

LSG vs SRH IPL 2025 : "तुझे केस पकडून..." भर सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात ठसण; व्हिडिओ व्हायरल

LSG vs SRH विरुद्ध सामन्यात गोलंदाज दिग्वेश राठी आणि फलंदाज अभिषेक शर्मा यांच्यात वाद झाला.
Published by :
Prachi Nate
Published on

(Abhishek Sharma and Digvesh Rathi Fight) काल लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रंगल्याचा पाहायला मिळाला. यादरम्यान हैदराबादने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे लखनऊने प्रथम फलंदाजी करत 205 धावांची खेळी खेळली त्यामुळे हैदराबादने 206 धावा करत लखनऊचा 6 विकेट्ससह पराभव केला. यावेळी अभिषेक शर्माने 20 बॉलमध्ये 59 धावांची खेळी खेळली होती. रवी बिश्नोईच्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने सलग 4 षटकार लगावले होते.

यादरम्यान लखनऊचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा यांच्यात वादाची ठिणगी पेटली. हा वाद इतका पेटला की यात अंपायरसह ऋषभपंतनेही मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं. लखनऊ विरुद्ध हैदराबाद हा सामना रंगत असताना 8 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलसाठी दिग्वेश राठी असताना त्याने अभिषेक शर्माला आऊट केलं. मात्र दिग्वेश राठीची नोटबुक सेलिब्रेशन केलं या सेलिब्रेशनने थोड वेगळ वळण घेतल.

अभिषेक शर्माला आऊट केल्यानंतर दिग्वेश राठीने हातवारे करत अभिषेकला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्याला हाताने इशारा करत बाहेर जाण्यास सांगितले. यावर अभिषेकचा देखील भडका उडाला. अभिषेक पुढे आल्यावर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं. या दोघांना शांत करण्यासाठी अंपायरला हस्तक्षेप करावा लागला, तरीही दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत राहिली.

एवढचं नव्हेतर ज्यावेळेस अभिषेकला हैदराबाद संघाचे खेळाडू मागे खेचून घेऊन जात होते. त्यावेळेस त्याने केसांवरून गोलगोल हात फिरवत आणि दिग्वेश राठीच्या केसांवर निशाणा साधला, आणि त्याला शांत राहण्याचा इशारा केला. दोघांच्याही भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भांडणाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं असून दोघांवरही सोशल मीडियावर जोरदार मीम्सचा पाऊस पडत आहे.

https://twitter.com/tarunreddyoo7/status/1924524516853919832

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com