IND Vs PAK Champions Trophy 2025 : 'सुपर संडे'ला रंगणार तगडा सामना! भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या सामन्यात भारताने आपले 6 गडी राखून विजय मिळवला होता. यानंतर भारताचा पुढचा सामना हा रविवारी 23 फेब्रुवारी कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानसोबत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान म्हटलं की, संपुर्ण देश हातातील सर्व काम सोडून हा तगडा सामना पाहण्यास सज्ज झालेला असतो. याचसोबत आपले भारतीय संघाचे खेळाडू देखील त्यांचा पुर्ण जोर लावून ही मॅच खेळण्यास सज्ज झाले आहेत.
पाकिस्तानच्या यजमानपदाखाली दोन कट्टर प्रतिस्पर्धी दुबईच्या मैदानावर आमने-सामने आहेत. पाकिस्तानला त्यांच्याच मैदानात धुळ चारण्यासाठी भारताची प्लेईंग रणनिती ठरली आहे. तसेच या हायहोल्टेज लढतीकडे संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष लागले आहे. जाणून घ्या कधी, कुठे आणि किती वाजता पाहायला मिळेल हा सामना..
कधी, कुठे आणि किती वाजता पाहाल सामना?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तानमधील हा सुपर सामना क्रिडाप्रेमींना टीव्ही तसेच डिजिटल अॅप्सवर पाहता येणार आहे. रविवारी दुपारी 2: 30 वाजता हा सामना पार पडणार असून यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल. टीव्हीवर हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवला जाईल तर JioHotstar च्या अॅप तसेच वेब साईटवर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. मोबाईवर हा सामना JioHotstar च्या अॅपवर फ्रीमध्ये पाहता येईल.
टीम इंडियाची प्लेइंग 11 संभाव्यता
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
पाकिस्तानची प्लेइंग 11 संभाव्यता
इमाम उल हक, उस्मान खान, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहिर / कामरान गुलाम, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.