CM Devendra Fadnavis : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज महामुकाबला!; फडणवीसांकडून टीम इंडियाला शुभेच्छा
25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना होणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची फायनल आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना खेळणार असून चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी कोण ठरणार याकडे संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. याचपार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज महामुकाबल्यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
फडणवीस म्हणाले की, "भारत आज सामना जिंकणार, 140 करोड जनतेचे आशीर्वाद भारतीय संघासोबत आहेत, ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळ खेळत आहे, त्या पद्धतीने भारताला आज जिंकण्याची शक्यता आहे आणि भारत जिंकणार".