Ind vs Eng: तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 142 धावांनी विजय; ३-0 ने जिंकली मालिका!

भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडला 142 धावांनी पराभूत करत ३-0 ने मालिका जिंकली.
Published by :
Prachi Nate

भारताने इंग्लंडला तिसऱ्या वनडे मालिकेत 142 धावांनी पराभूत करत विजयाचा झेंडा रोवला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय संघ खूप काळानंतर वनडे सामने खेळण्यासाठी उतरला होता, पण भारताच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आयसीसी स्पर्धेसाठी संघांची तयारी चांगली कशी आहे हे दाखवून दिले.

शुभमन गिलचे 112 शतक, विराट कोहलीचं अर्धशतक करत कमबॅक, श्रेयस अय्यरची 78 धावांसह वादळी खेळी आणि अर्शदीप सिंगसह हर्षित राणा याने चांगली गोलंदाजी केली. भारतीय संघाचे फलंदाज आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात दणदणीत विजय नोंदवला आहे. भारतीय संघाने केलेल्या 356 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 214 धावांवर गारद झाला. भारताने या वनडे मालिकेत इंग्लंडवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com