T20 World Cup 2026  : टी-20 विश्वचषकामध्ये भिडणार भारत- पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना

T20 World Cup 2026 : टी-20 विश्वचषकामध्ये भिडणार भारत- पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना

फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत भारत आणि श्रीलंकेत होणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. तर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि अमेरिका दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे.

तर दुसरीकडे या स्पर्धेत पुन्हा एकदा ग्रुप सामन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) सामना होणार असल्याची शक्यता आहे. मीडिया अहवालानुसार, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघाना चार ग्रुपमध्ये विभागले जाणार आहे. प्रत्येक गटात पाच संघ असणार असून भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार आहे. तर अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स इतर तीन संघ या ग्रुपमध्ये असणार आहे.

तर भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. तर या स्पर्धेत भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध (USA) 8 फब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये तर 12 फब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबियाविरुद्ध सामना होणार आहे. तर कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध आणि 18 फेब्रुवारी रोजी मुंबईत नेदरलँड्शी सामना होण्याची शक्यता आहे.

भारताचे टी-20 विश्वचषक सामने (संभाव्य)

8 फेब्रुवारी : भारत विरुद्ध अमेरिका, अहमदाबाद

12 फेब्रुवारी : भारत विरुद्ध नामिबिया, दिल्ली

15 फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो

18 फेब्रुवारी : भारत विरुद्ध नेदरलँड्स, मुंबई

2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी सर्व 4 ग्रुप (संभाव्य)

ग्रुप 1 : भारत, पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया, नेदरलँड्स

ग्रुप 2 : ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान

ग्रुप 3 : इंग्लंड, वेस्ट इंडिज, इटली, बांगलादेश, नेपाळ

ग्रुप 4 : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई, कॅनडा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com