India vs Australia 4th Boxing Day Test: बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस! शुभमन गिल मात्र भारताच्या प्लेईंग 11 मधून बाहेर....
भारतीय संघ बॉक्सिंग डे टेस्टसाठी सज्ज झाला आहे. 26 डिसेंबरपासून मेलबर्नला चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा सामना सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 या कसोटी मालिकेतील चौथा सामना 26 तारखेपासून सुरु होणार आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीवर विजय मिळवला आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात काही बदल करण्यात आले आहेत.
यावेळी भारतात वॉशिंग्टन सुंदर याचे पुनरागमन करून त्याला शुभमन गिलच्या जागेवर संधी देण्यात आली आहे, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये फार मोठा बदल केला आहे. यामुळे आता वॉशिंग्टन सुंदर हा सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. तर नॅथन मॅकस्विनीच्या जागेवर ऑस्ट्रेलियाने सॅम कोन्टासला संधी देत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे.
या मालिकेत सध्या पहिल्या तीन सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरी आहे. मेलबर्न कसोटीत विजय मिळवणारा संघ मालिकेतील पराभव टाळून सिडनीमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटीत मालिका विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल.त्यामुळे हा सामना मालिकेच्या निकालाच्या दृष्टीनेही महत्वाचा ठरणार आहे.
भारतीय संघ- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलिया संघ - उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नेथन लायन, स्टॉट बोलंड.