Asia Cup 2025 : भारताचा आशियाकपमध्ये रेकॉर्ड,पण अंतिम सामन्यात टीम इंडियाची परिक्षा

Asia Cup 2025 : भारताचा आशियाकपमध्ये रेकॉर्ड,पण अंतिम सामन्यात टीम इंडियाची परिक्षा

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत खेळू नये. या ट्रॉफीतून बाहेर पडावे असा देशवासीयांचा सूर होता. पण BCCI काही तयार झाले नाही. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा धुतले आहे. रविवारी दुबईमध्ये आशिया कप 2025 (Asia Cup 2025)मधील अंतिम सामना खेळला जाईल.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • भारताने आतापर्यंत आशियाकपमध्ये पाकिस्तानला दोनदा धुतले

  • आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली

  • टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपावर नाव कोरले

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत खेळू नये. या ट्रॉफीतून बाहेर पडावे असा देशवासीयांचा सूर होता. पण BCCI काही तयार झाले नाही. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत पाकिस्तानला दोनदा धुतले आहे. रविवारी दुबईमध्ये आशिया कप 2025 (Asia Cup 2025)मधील अंतिम सामना खेळला जाईल. दोन्ही देश तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येतील. टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपावर नाव कोरले आहे. तर पाकिस्तानला दोनदाच विजय मिळवता आला. पण टीम इंडियाला (team India)कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कच खाण्याचा आजार जडला आहे. ही आकडेवारी पाकिस्तानचे पारडे मजबूत असल्याचे दाखवते…

भारताचा आशियामध्ये रेकॉर्ड

आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली. तर 2016 पासून ही स्पर्धा पहिल्यांदाच टी-20 स्वरुपात खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत भारतीय संघाने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला आहे. 8 वेळा या कपवर टीम इंडियाने नाव कोरलं आहे. पाकिस्ताने दोनदा, श्रीलंकेने सहा वेळा आशिया कप जिंकला आहे. आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान कधीही अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले नव्हते.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 1985

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1985 मध्ये मेलबर्न येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी अंतिम सामना झाला होता. पाकिस्तानने 176 धावा केल्या होत्या. तर भारताने 17 चेंडून शिल्लक असताना 8 गडी राखत विजय मिळवला होता. त्यावेळी कृष्णमाचारी श्रीकांत आणि रवी शास्त्री यांनी अर्धशतक ठोकले होते.

ऑस्ट्रल आशिया कप 1986

1986 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रल आशिया स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत रोमांचक सामन्यात अखेरच्या षटकात एका गडी राखत सनसनाटी विजय मिळवला होता. भारताने 7 बाद 245 धाव केल्या होत्या. जावेद मियांदादने चेतन शर्माच्या शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकत विजय मिळवला होता. हा सामना आजही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे.

विल्स ट्रॉफी 1991

विल्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 6 बाद 262 धावा पाकिस्तानने केल्या होत्या. पण भारतीय संघ 190 धावांवर गुंडाळण्यात पाक संघाला यश आले होते. आकिब जावेदने भेदक मारा करत 37 धावा देत सात बळी घेतले होते.

ऑस्ट्रल कप 1994

शारजाह येथे झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचे वर्चस्व दिसले होते. या सामन्यात पाकिस्तानच्या 250 धावा झाल्या होत्या. भारताचा संघ 211 धावांवर तंबूत परतला होता.

सिल्व्हर ज्युबिली कप 1998

भारत,पाकिस्तान आणि बांगलादेशात सिल्व्हर ज्युबिली कप 1998 मध्ये खेळवण्यात आला होता. ढाका येथे पहिला सामना भारताने दुसरा पाकिस्ताने तर तिसरा अंतिम सामना अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने जिंकला होता.

पेप्सी कप 1999

पेप्सी कप 1999 मध्ये आयोजित करण्यात आला होता. अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान भिडले होते. बंगळुरू येथे हा सामना झाला. त्यात पाकिस्तानने 291 अशी मोठी धावसंख्या उभारली. पण भारतीय संघ 168 धावांमध्येच गारद झाला होता.

कोका कोला कप 1999

या सामन्यातही भारतीय संघाची हाराकिरी सुरूच होती. या सामन्यातही भारताचा लाजीरवाणा पराभव झाला होता. भारतीय संघ 125 धावांवरच तंबूत परतला होता. पाकिस्ताने कोणताही गडी न गमावता हा सामना अगदी सहज जिंकला होता.

टी 20 विश्वचषक 2007

24 सप्टेंबर 2007 मध्ये जोहान्सबर्ग येथे भारत -पाकिस्तान अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. भारताने 5 बाद 157 धाव केल्या होत्या. विजयाच्या अगदी जवळ पाकिस्तानी संघ 152 धावांवर सर्वबाद झाला होता.

किटप्लाय कप 2008

हा सामना अनेकांच्या स्मरणात राहिला. यामध्ये पाकिस्तानने तीन बाद 315 धावांचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले होते. भारतीय संघाने हाकारे पिटत 290 धावा केल्या. 25 धावांनी भारताचा पराभव झाला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017

4 बाद 338 असा धावांचा डोंगर पाकिस्तानने या सामन्यात उभा केला होता. अंतिम सामन्यात टीम इंडियाला काहीच कामगिरी दाखवता आली नाही. भारतीय संघ सर्वबादग 158 धावांवर गुंडाळल्या गेला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com