Champions Trophy 2025 : भारताचा न्यूझीलँड दणदणीत विजय, 'या' संघाशी होणार सेमीफायनलमध्ये सामना
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ तब्बल 24 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमने सामने आले. यापूर्वी 2000 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली होती. मात्र आता 24 वर्षांनी मॅच झाली आणि भारताने न्यू झीलँडवर विजय मिळवला आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीमुळे भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळवला.
अशातच आता भारत आणि न्यूझीलँड यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगला होता. सुरुवातीला नाणेफेक जिंकत न्यूझिलँडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पहिल्याच वेळी तीन महत्त्वाचे खेळाडू आऊट झाले. यानंतर, श्रेयस आणि अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. भारताने 50 षटकांत नऊ गडी गमावून 249 धावा केल्या.
त्यानंतर हार्दिक पांड्याने रचिन रवींद्रला बाद करून न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. रचिनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि सीमारेषेवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलने एक शानदार झेल घेतला. 12 चेंडूत सहा धावा काढून रचिन बाद झाला. वरुण चक्रवर्तीने विल यंगला आऊट करून न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला आहे. नंतर न्यूझीलंडने 49 धावांवर दोन विकेट गमावल्या. यंग 35 चेंडूत तीन चौकारांसह 22 धावा काढून बाद झाला.
भारताची अपराजित मालिका सुरूच राहिली. संघाने तिन्ही सामने जिंकून गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. आता 4 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. ऑस्ट्रेलियन संघ ग्रुप बी मध्ये दुसरे स्थानवर आहे.