IPL 2025 Playoffs: प्लेऑफचे 4 संघ ठरले, कधी होणार सामने? कोण मारणार बाजी? प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक पाहा
(IPL 2025 Playoffs) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये काल प्लेऑफसाठी सामना खेळला गेला. यामध्ये मुंबई इंडियन्सने वानखेडेच्या मैदानावर दिल्लीचा पराभव केला. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने 180 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सला 121 धावाच करता आल्या.
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आयपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या विजयासह आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्सनंतर आता मुंबई इंडियन्स हा चौथा संघ ठरला आहे.
आता प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल होत असतो. पहिला क्वालिफायर सामना 29 मे रोजी न्यू चंदीगड येथे गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये होईल. त्यानंतर ३० मे रोजी एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटरमध्ये जिंकणाऱ्या संघामध्ये हा सामना होईल. तर अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे.