MI Vs PBKS : IPL 2025 : पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत IPL 2025 च्या फायनलमध्ये मारली एन्ट्री
(MI Vs PBKS )अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (PBKS) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील आयपीएल क्वालिफायर 2 सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला होता. काही वेळानंतर सामना सुरु झाला.
पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने पंजाबला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने 207 धावा केल्या आणि क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो ही जोडी मैदानात उतरली. रोहित लवकर बाद झाला. रोहित 7 चेंडूत 8 धावा करून आऊट झाला. मात्र बेअरस्टोने 38 धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी चांगली भागीदारी करत दोघांनी एकूण ८८ धावा केल्या. त्यानंतर नमन धीरने 37 धावा केल्या.
कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहल वढेरा यांनी चांगली भागीदारी केली. श्रेयस अय्यरने 87 धावांची नाबाद खेळी खेळली. 2014 नंतर फायनलमध्ये पोहचण्याची पंजाबची ही पहिली वेळ ठरली आहे. 3 जूनला अंतिम सामना होणार असून पंजाबसमोर आता अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुचं आव्हान असणार आहे. या सामन्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.